शिक्षणाच्या नावान चांगभल - Story
“ शिक्षणाच्या नावान चांगभल”
लेखक: प्रशांत व्यवहारे
आज
पुष्करच्या मनामध्ये सकाळ पासूनच विचारांचा कल्लोळ चालला होता! शाळेत मुलांना शिकवतांना
त्याचा लक्ष्यच आज काही केल्या लागत न्हवत!
आज
त्याची कन्फर्म रुजू ची आर्डर पोस्टाने येणार होती होती, व त्यामुळे तो सकाळ पासून
पोस्टमन काकाची आतुरतेने वाट पाहत होता!
डी.
एड झाल्या नंतर पुष्कर तीन वर्षा पासून ज़िल्हा परिषद् शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम
पाहत होता,
सकाळ
पासून त्याने दोन तीनदा हेडमास्टर सरांच्या केबिन मधे जाउन आर्डर बद्दल चौकशी केली!
आनी
आता तो चौथ्यांदा हेड सरांच्या केबिन च्या दरवाज्या बाहेर उभा होता.
पुष्कर:
हेड सर आत एउ का!
हेड
सर: या पुष्कर, अरे हो तुमची आर्डर अजुन आली नाहीं बरे का !
पुष्कर: आता पर्यंत तर यायला हवी होती सर, शिक्षण सेवकाचा
कालावधी संपल्या नंतर सम्पूर्ण दोन महीने झाले बिन पगारी आहे!
हेड
सर: पुष्कर समजू शकतो हो तुमची घालामेल, एके काळी माझी पन तुमच्या सारखीच अवस्था होती
! काळजी करू नका हो , ते आताचे अधिकारी चांगले आहेत आनी माझे कन्फर्म बोलन झाले आहे
त्यांच्या सोबत, आज ना उदया नकी येईल आर्डर ठीक आहे!
पुष्कर:
ठीक आहे सर तुम्ही आहात म्हणून आम्हाला आधार आहे, नाहीं तर कोण कुठला कोणाला अशी मदद
करते!
हेड
सर: मदद वगैरे नाहीं हो पुष्कर, ते फ़क्त तुमचे शिक्षणातले कौशल्या बघून बाकी काही नाहीं,
बर हां ते आर्डर मिळाल्यावर पार्टी च विसरु नका बर!
इतक्यात
पोस्टमन काका हेड सरांच्या
केबिन मधे शिरतात!
पोस्टमन:
हो हो तर सर
पार्टी तर पुष्कर मास्तरनी
दयालाच पाहीजे!
कारन
त्यांच्या नावाच एक पाकिट शिक्षण
अधीकारी ऑफिस मधून आले
आहे! बहुदा आर्डर असेल!
हे
ऐकून पुष्कर आनन्दित झाला!
पुष्कर:
हो काका दया ना, मी
केव्हाची वाट बघतोय!
पोस्टमन
एक खाकी रंगाचे पाकिट पुष्कर
च्या हाती देतात!
पुष्कर
ते उघडून बघतो आनी त्याच्या
डोळ्यातून आश्रू वहायला लागतात!
हेड
सर: काय हो पुष्कर
काय झाले
! अचानक एवढे भावनिक झालात!
पुष्कर:
सर माफ़ करा पन
हे आनंदाचे आश्रू आहेत आज माझ्या आई वडिलांनी केलेले कष्ट
पूर्ण झाले! माझी ही कन्फर्मेशनची आर्डर आहे!
पन
दुसऱ्या गावाला चार्ज दीला, दहीगांव ला जायचे आहे
७ दिवसात अस हे पत्र
म्हणते!
हेड
सर: अरे वा , अभिनन्दन
पुष्कर !
पोस्टमन
काका: अभिनन्दन हाँ पुष्कर सर
आता पेढ़े दीले पाहीजे
तुम्ही!
पुष्कर:
हो नक्कीच उद्याच घेऊन येतो पन
उदय तुम्ही या!
हो
नक्की असे म्हणून पोस्टमन काका
तिथुन निघून जातात!
हेड
सर पुढची कागदी कार्यवाही करून, पुष्करला परत वर्गा मधे
जायला सांगतात!
पुष्कर
व त्याचे परिवार करीता आजचा दिवस जणू
फार सुखाउन टाकनारा होता! पुष्कर एक शेतकरी मजूर
कुटुंबातला होता! त्याचे वडील शेती व
आईने मजूरी करून त्याला शिकवले
होते!
बारावी
नंतर कस बसे डी,
एड करून व भर्ती
परीक्षा पास करून पुष्कर
तीन वर्षा पूर्वी शिक्षण सेवक म्हणून लागला
होता! तसे तीन हजार
पगारात काय होते! पन
तो कसा बसा काटकसर
करून जीवन जगत होता
त्या तीन हजार मानधनावर जे
सुद्धा नेहमी लेट व्हायचे!
पन
आता त्याला कन्फर्म ची आर्डर मिळाली
होती!
त्याच
आनंदाच्या भरात तो
वर्गात परत गेला व मुलांना शिकवायला
लागला!
संध्याकाळी
तो घरी जात नाही
तोवर बातमी घरी पोहोचली होती
हेड
सर पुष्कर ला त्यांच्या मोटरसाइकिल
वर त्याच्या घरी सोडून आले!
घरी
येताच त्याने आनंदाने आई व वडिलांना
बाहेरूनच आवाज दिला!
पुष्कर:आई बाबा बाहेर
या कुठे आहात तुम्ही
!
आई: हो
हो लेकरा थांब मीठ भाक़र
उतरवते !
पुष्कर
ची आई आनी बाबा
दरवाज्यात आले, आई ने
पुष्कर वरुन मीठ भाकर
ओवाळून टाकली आनी पुष्कर घरात
आला
पुष्कर:
बाबा हे बघा परमनेंट
ची आर्डर येत्या ७ दिवसात दाहिगाव
ले रुजू व्ह्यायचे आहे
!
बाबा:
लेकर तुझे अभिनन्दन आज
आम्ही दोघे खूप खुश
आहोत, दुपारीच पोस्टमन भाउ ही बातमी
आम्हाले सांगून गेले !
आई:
दाहिगावले जायचे चल बाई तुझी
तैयारी करून दया लागल
! लाम्बाचा प्रवास है !
बाबा:
अवा तैयारी नंतर कर पहले
गोड जेवण वाढ भुक
लागली आसान त्याले !
आई:
हो हो लेकरा लवकर
हात पाय धुवा दोघाइले
जेवण वाढते !
आज
या क्षणी आई वडिलांना
खुश बघून पुष्कर ला
जीवनात खूप काही मिळवले
असे वाटत होते!
पुढचे
पांच दिवस हा हां म्हणता
निघून गेले !
सहाव्या
दिवशी पुष्कर चा
शेवटच दिवस शाळेत हेड
सर व इतर शिक्षकांनी
एका छोटेखानी कार्यक्रमात उरकला!
त्याचे
विद्यार्थी दुखी होते तरीही
त्यांनी पुष्कर ला एक आठवणीत
राहिल असा त्याचा दिवस
घालवला कोनी आज मस्ती केली नाही
की अभ्यासात कसूर!
शेवटचे
तास मुले फ़क्त पुष्कर
चालला म्हणून दुखी होते हे
पुष्कर ला दिसल्या शिवाय
राहिले नाहीं !
पन
काय करणार!
शाळा
सुटण्यास काही मिनट बाकी
असतांना हेड सर त्याचे
वर्गात आले !
चला
पुष्कर सर निरोप दया
आता लेकरांना, त्याहीले काही दिवस करमनार
नाहीं अस दिसते, ते
असो पन तुमच्या समोर पूर्ण आयुष्य
पड़ल आहे!
पुष्कर:
हो सर, हे बघा
लेकरांनो मी आता दुसऱ्या गावाले बदली वर चाललो
आहे ! आता तुम्हाले दूसरे
सर येतील त्यांना त्रास देऊ नका! चांगला
मन लाऊन अभ्यास करा
आन पास व्ह्या, खूप
मोठ बना आपल्या आइबापाची
काळजी करा ! येतो मी आता
अस म्हणून पुष्कर बाहेर पड़ला !
वर्गाबाहेर
पडतांना त्याला मुलांचे हुन्द्के ऐकु आले, पन
मागे वळून पाहील तर
मुले जाऊ देणार नाहीं
म्हणून त्याने मागे वळून पाहील
नाहीं.
दुसऱ्या
दिवशी सकाळी लवकरच आई वडिलांचा निरोप
घेऊन व आपले सामान
घेऊन तो दाहिगाव ला
जायला निघाला. पहिली बस पकड़ून तो तालुक्याच्या गावी
गेला व तिथुन दाहिगाव
ची बस त्याने पकड़ली
!
बस
मधे तशी बरीच गर्दी
होती !
पुष्कर
आधी बसला होता म्हणून
त्याला जागा मिळाली, काही
वेळात गर्दी कमी झाली आन
बरेच लोक उतरले, पुष्करच्या
शेजारील सीट रिकामी झाली
होती तिथे एक म्हातारा
बसला !
म्हतार्याने
पुष्कर कड़े बघितले
म्हातारा:
गुरुजी कुठे निघाले म्हणायचे
!
पुष्कर:
काका दहीगावला शाळेवर रुजू व्हावयाचे आहे,
माझ्या परमनेंट ची आर्डर निघाली
आहे !
म्हातारा
दाहिगाव ऐकून दचकला
म्हातारा:
दाहिगाव ! अहो पन गुरुजी
ते तर अडानी लोकांचे
गांव आहे तिथे तुमचे
काय काम !
पुष्कर:
म्हणूनच तर तिथल्या लोकांना
साक्षर बनवावे असा सरकारी निर्णन
आहे व म्हणूनच माझी
नियुक्ति तिथे झाली असेंन.
म्हातारा:
अहो तसा नहीं गुरुजी,
अहो ती कर्मदरिद्री लोक काय शिकणार!
असो तुम्ही जा मग माहीत
पडेल तुम्हाला!
तितक्यात
बस अचानक थांबली, कंडक्टर खेकसला अहो आबा उतरा
कामरगाव स्टॉप आला तुमचा, उतरता
आता का नेउ पुढे
!
पुष्करच्या
जवळ बसलेला म्हातारा कंडक्टरकड़े रागने पाहत घाईने उतरला
आनी बस पुढे निघाली
!
रस्ता
तसा खराब होता पन
बहुदा आजु बाजूला बागायती
शेती असल्यामुळे खिड़की मधून थंड हवा
येऊ लागली त्यामुळे पुष्करला झोप येऊ लागली!
त्याला
झोप लागणार इतक्यात बस परत धुळ
उडवत अचानक थांबली, त्या झटक्याने पुष्करला जाग आला !
आनी
परत कंडक्टर ओरडला, चला दहीगांव वाले
प्रवाशी उतरा लवकर !
हे
ऐकताच पुष्कर झटक्यात उठला आन त्याची
ब्याग घेऊन खाली उतरला
!
उतरल्यावर
त्याला काही लोक तिथे
उभे दीसले
लगबगी
न एक खाकी कपडे
घातलेला मानुस त्याचे पुढे आला, बहुतेक
तो शाळेचा शिपाई असावा !
तुम्ही
पुष्कर गुरूजी का !
पुष्कर:
हो मीच पुष्कर आहे
तुमच्या गावात शिक्षक म्हणून माझी बदली झाली
आहे !
शिपाई:
हो मी शिपाई बाबू
आहे सर, हेड सरांनी
तुम्हाला घ्याला पाठवल मला आना ती
ब्याग मी घेतो !
आनी
त्याने ती ब्याग घेऊन
तिथेच उभ्या असलेल्या बैल गाडीत ठेवली आनी पुष्कर ला
बैल गाडीत बसवून ती गाड़ी हाकत
तो निघाला.
पुष्कर:
गांव दूर आहे का,
आनी आपली शाळा कुठे आहे
!
बाबू:
शाळा ती आता नाहीं हो
गुरूजी, हेड सर सांगतीलच
तुम्हाला !
पुष्कर:
शाळा नाहीं म्हणजे !
बाबू
: अहो गुरूजी गावातील गटांचे राजकरण किती ख़राब असते
ह्याचे हे गांव उदाहरणच
बनल आहे !
माहीत
पडेल तुम्हाला अजुन काय सांगू!
पुष्कर
आता कोड्यात पड़ला, शाळा नाहीं म्हणजे, अस कस, हे
काय गौड़ बंगाल आहे
!
तो
विचार करत होता इतक्यात
एक मोटर धुराळा उडवत
व हॉर्न वाजवत त्यांच्या बैलगाड़ी शेजारूंन जोरात
गेली, की
त्यामुळे बैल बिथरले ज्यांना आवरताना बाबू ला बरीच
कसरत करावी लागली, वरुन
पुष्कर व बाबू दोघे
धुळी मधे माखले गेले
बाबू
ने गावरान शिवी हासडली ! रामराव
च्या तर….
पुष्कर
: कशी हे लोक गाड़ी
इतक्या बेदरकार पने चालवतात ! गाड़ी
तर विदेशी दिसते !
बाबू
: काय बोलणार सर ह्यांना, इथले
लोक असेच देशी भले
गाड़ी विदेशी !
पुष्कर
: कोण हे रामराव् !
बाबू
: रामराव तालुक्यातील फार मोठे जमींनदार
व राजकारणातील वजनी व्यक्तित्व पन
अंगठा बहादुर, आपली शाळा
बंद करण्यामागे ह्यांचा पन हात आहे
!
पुष्कर
: म्हणजे ते कस काय
बाबू
: अहो सर गावात दोन
गट आहेत, एक सरपंचाचा आन
एक रामरावाचा, रामराव तसे मोठ्या मनाचे
होते पन गावातील काही
लोकानी त्यांना सरपंचा विरुद्ध भडकाउन दिल आनी मग
रामरावांचा स्वभाव बदलला, पहीले ते गावातील राजकारणात
भाग घेत नसत पन
काही स्वार्थी लोकांच्या सांगण्यावरुन त्यांनी सरपंचा विरुद्ध निवडणुकीत स्वतचे पैनल उभ केल
! आनी सरपंचा विरुद्ध खूप अप-प्रचार
केला ! पन तरीही पुनः
सरपंचच निवडून आले ! हयामुळे त्यांच्या तालुक्यातील राजकारणी वर्चस्वला धक्का बसला असा कही
लोकांनी त्यांच्या मनावर बिंबवले.
आनी
मग तवापासून गावात कुरघोड़ीच राजकारण सुरु झाल ! गावातील
सारी विकास कामे ठप्पा झाली
आन आपली शाळा सुद्धा
त्यामधे बळी पडली !
पुष्कर
: शाळेचा व राजकारणाचा काय
संबंध.
बाबू
: सर मोठा संबंध आहे,
दोन वर्षापूर्वी तालुक्यात खूप पाऊस झाला,
शाळा इमारतीची अवस्था खूप जूनी होती
व त्यामुळे पावसाळ्यात शाळेच छप्पर उड़ाल, भिंती पडल्या, त्या दुरुस्त करण्यासाटी
हेड सर व सरपंच
ह्यांनी प्रयत्न करून निधी मंजूर
करवला व काम ही
सुरु झाले ! पन ती जागा
पूर्वी रामराव च्या पूर्वजांच्या मालकीची
होती ज्यावर शाला आहे मग
काय रामराव ह्यानी काही कारस्थाने केली
व वरुन कोर्ट आदेश आनुन,
ते काम अर्ध्या मधातच
थांबवल जे की आजतायागत
पूर्ण झाले नाहीं ! आता
आपली शाळा बिन भिंती,
छप्पराची कशी चालणार ! लोकांनी
त्यांची मुले शाळेत पाठवायचे
बंद केली मग काय
शाळा नाहीं तर कसले शिक्षण
!
पुष्कर:
मग हेड सरानी दुसऱ्या
ठिकाणी शाळा सुरु केली नाहीं का
!
बाबू:
हेड सरानी तर खूप प्रयत्न केले
दुसऱ्या जागी शाळा सुरु करण्याचे
पन जागोजागी रामरावानी अडथळे आनुन गुंड पाठउन
ती सुद्धा बंद पाडली !
आता
तुम्हीच सांग ह्या राजकारणी लोकांच्या
भांडणात त्या मुलांचा काय
हो दोष.
पुष्कर:
मामला तर फारच गंभीर
दिसतो ! काही तरी करायला
पाहिजे !
इतक्यात
त्यांची बैल गाड़ी एका
ठिकाणी थांबली, तो एक छोटा
रास्ता होता व त्या
रस्त्याच्या मधेच ती मघाची
कार उभी होती, त्यामुळे
बैल गाड़ी पुढे जाऊ
शकत न्हवती!
गाड़ी
च बोनेट उघड होता, त्यामधून
धुर नीघत होता व
एक तरुणी त्या गाडीच्या बाजूला
उभी होती !
बैल
गाड़ी दिसतच ती गाड़ी जवळ
आली !
तरुणी:
अहो दादा जरा माझी
गाड़ी बंद पडली थोड़ी
मदद करा ना !
बाबू:
औ ताइसाहेब मघा जेवा तुम्ही
धुर उड़वात गेला तुम्हाला कळले
नहीं रस्त्यावर दुसरी पन लोका चालतात,
तेव्हा तर तुम्ही खूप
उडत होता ! आता काय झाल
हवा संपली का इम्पोर्टेड सवारीची
! मदद बिदत काही मिळणार
नाहीं चला व्हा बाजूला
!
तरुणीने
पुष्कर कड़े पाहले, तीला
वाटले हां तरी काही
मदद करेल !
तरुणी:
अहो निदान तुम्ही तरी मला मदद
करा !
पुष्कर:
बाबू थोड़ा थाम्ब ! कसे
ही असल तरी ह्या
बाई आहेत ह्यांची मदद
केलीच पाहिजे !
बाबू:
ठीक आहे सर !
पुष्कर
गाड़ी कड़े गेला व
त्याने इंजन कड़े
बघितल, ह्याचे मैन्युअल कुठे आहे ! ती
तरुणी मैन्युअल घेऊन आली !
त्यामधे
जनरल प्रोब्लेम्स एंड सोलूशन्स चा
एक चार्ट दिला होता त्यामधे
इंजन गरम झाल्यावर कूलैंट
चेक करण्याचे निर्देश देलेले होते! पुष्कर ने चेक केले
तर खरच कूलैंट संपल्यामुळे
इंजन ओवर हीट झाले
होते व त्याचा अलार्म
वाजून ही गाड़ी न
थांबवल्यामुळे गाड़ी कंप्यूटर ने
स्वताच बंद केली होती
!
पुष्कर:
मैडम, कूलैंट संपले अस दीसते, काही स्पेयर मधे
ठेवले आहे का गाड़ी
मधे !
तरुणी:
माहीत नाहीं, गाड़ी माझ्या बाबांची
आहे !
पुष्कर:
बर थंड पाण्याची बाटली
आहे का तुमच्या
कड़े!
तरुणी:
हो, तुम्हाला तहान लागली का
!
पुष्कर:
नाहीं हो तुमच्या गाड़ीला
तहान लागली ! कूलैंट संपल्या मुळे इंजन ओवर
हीट झाले आहे, थंड
पानी टाकले की तिची तहान
भागेल आन मगच ती
तुम्हाला पुढे नेयील !
तरुणी:
ओह, ठीक आहे !
तिने
गाडीतील फ्रिज मधल्या काही पाण्याच्या बाटल्या
काढून पुष्कर कड़े दिल्या, पुष्कर
ने त्या कूलन्ट टैंक
मधे टाकल्या, थोड्या वेळात इंजन थंड झाले !
पुष्कर:
ओके मैडम आता इंजन
सुरु करा !
तरुणी
ने स्टार्टर फिरवतच गाड़ी पुनः सुरु
झाली !
तरुणी:
थैंक यु खरच तुम्ही
माझी खूप मदद केली
त्याबद्दल धन्यवाद मी राधा रामराव्
पाटिल तुमचे नाव काय म्हणालात.
पुष्कर:
मी पुष्कर चोपड़े, ह्या गावच्या शाळेत
शिक्षक म्हणून रुजू झालो आहे,
अच्छा तुम्ही गाड़ी थोड़ी हळू
चालवा उन्हाळयाचे दिवस आहेत, गाड़ीमधे
कूलैंट टाकायला सांग नाही तर
असच गाड़ी बंद पडत
जाईल !
तरुणी:
ओके किती पैसा घ्याल
तुम्ही !
पुष्कर:
अहो मैडम पैसे नको
हो फक्त माझ्या काढून
एक मनुष्य म्हणून ही मदद समझा
!
तरुणी:
ओके थैंक यू अगेन, भेटूयात
या घरी कधी तरी पैसा
नहीं कमीत कमी तुम्हाला
मेजवानी देइल या तुमच्या
मदती बद्द्ल !
पुष्कर:
ठीक आहे राधा मैडम
भेटुयात या !
राधा
गाड़ी घेऊन पुढे निघून
गेली !
पुष्कर
बैल गाडीत बसला आन बाबू
पुनः बैल गाड़ी चालवु लागला
!
थोड्या
वेळात ते गावात पोहचले
गावातील लोक बैल गाड़ी
कड़े नवा मानुस आला
म्हणून कुतुहलाने पाहु लागले
असाच
एक म्हातारा साइकल वर चालला होता
त्याने बाबू ला विचारला
!
म्हातारा:
बाबू कोई हाएत हे
पाव्हणे !
बाबू:
अहो हे आपले शाळेचे
नविन गुरूजी आहेत, आजच बदली होऊं
इथे आपल्या गावात आले आहेत !
म्हातारा:
आर पन शाळा कुठे
सुरु आहे बाबा, लवकार
काही तरी करा, पोरांना
भी कधी पासून शाळेची
आस लागली आहे!
पुष्कर:
हो आजोबा गावातले लोक साथ देतील
तर काही दिवसात करू
की सुरु !
म्हातारा:
चांगले होईल गुरूजी तसा
झाला तर चला निघतो
भेटु, या जेवायले कदी
तरी आमच्या घरी, आस म्हणून
तो म्हातारा पुढे निघून गेला.
बाबू
: सर लोकांना असे वायदे करू नका सर तुम्हाला खरे परिस्थीती किती गंभीर आहे हे महित
नाहीं !
पुष्कर
: बाबू अहो आपणच नहीं म्हटला तर ही लोक कशी आपल्यावर विश्वास करतील
बाबू
: हो सर, ते ही बरोबर आहे म्हणा !
आता
बाबू ने बैल गाड़ी
एक मोठ्या घरा समोर थाम्बवली
!
पुष्कर
त्यातून उतरला तसाच एक मानुस
धावत बाहेर आला
बाबू:
ज्ञानू भाउ तुमची बैल
गाड़ी संभाळा आनी त्याने गाड़ी
चा कासरा ज्ञानू कड़े देऊन पुष्कर ची
ब्याग उचलून घरात दाखल झाला,
पुष्कर सुद्धा त्याच्ये मागे चालत त्या घरात शिरला
!
तो
एक जूना वाडा होता,
त्याने दारावरिल पाटी वाचली, “माधव
पाटिल सरपंच दाहिगाव्” !
घरात
शिरताच एक दोन गृहस्थ
त्याच्य समोर आले ! या
पुष्कर मी हेड मास्टर
आदिनाथ आनी हे या
गावचे सरपंच आनी आपले आश्रय
दाते माधव भाऊ !
माधव
भाऊ: या गुरूजी तुमचा
प्रवास का झाला !
पुष्कर:
हो तसा चांगला झाला
भाऊ, विचारल्या बद्दल धन्यवाद.
आदिनाथ:
पुष्कर तुमची राहण्याची सोय इथे सरपंच
साहेबानी केली आहे !
पुष्कर:
सर तुमच्या सोबत आपल्या शाळेबद्दल
बोलायचे आहे !
आदिनाथ:
म्हणजे आहो गावात शाळा फ़क्त नावापुर्ती
आहे ! ती तुरतास सुरु
होण्याचा काहीच अंदाज नाही,तुम्ही काही
दिवस इथे रहा, बदली
करीता अर्ज करा, मंजूर
झाला की मग जा
!
पुष्कर:
नाहीं सर मी गावात
परत शिक्षण सुरु करण्याबद्दल म्हणत
आहे !
माधव
भाऊ: अहो पुष्कर गुरूजी आम्हाला
सुद्धा ते हव आहे ! पन
काय करणार काही लोकांनी बांधकाम
बंद पाडले आहे व जर
ग्रामपंचायत मार्फ़त सुरु करतो म्हटला
तर तो रामराव आड़वा
येतोय !
पुष्कर:
सर कोन म्हटल की
शाळेला पक्की ईमारत लागते जर तुम्ही परवानगी
दयाल तर मी एखाद्या
मैदानावर सुद्धा मुलांना शिकवण्यास तयार आहे !
माधव
भाऊ: गुरूजी मानल तुम्हाला ! तुमचे
विचार तर खरच खुप
चांगले आहेत, हेड सर मी ह्यांच्या कामात
मदद करण्यास तयार आहे !
पुष्कर:
सरपंच साहेब तुम्हे आज सांध्याकाळीच ग्राम
सभा बोलवा आन गावातल्या लोकांना
शाळा पुनः सुरु करण्याबद्दल
सांगा, मी उघड्या माळ
रानात किवा गोठ्यात सुद्धा
मुलांचे वर्ग घेऊ शकतो
!
माधव
भाऊ: ठीक आहे पन
रामराव् गुंड प्रवृति चा
मानुस आहे तो प्रसंगी
तुमच्यावर हल्ला ही करू शकतो
!
पुष्कर:
माझ्या मागे माझे वृद्धा
आई वडील आहेत, जे
स्वतःची देखभाल करू शकतात, म्हणून
काळजी नसावी मी तयार आहे
कुठला ही धोका पत्करण्यास
!
आदिनाथ:
ठीक आहे पुष्कर मी
पन तुझ्या सोबत आहे ! मला
तुझ्या सारख्या निर्भिड सोबत्याचीच गरज होती आता
शिक्षणासाथी लढु, मेलो तरी
बेहत्तर पन आता मागे हटनार
नाहीं !
माधव
भाऊ: शाबास रे पट्ठे, चला
तुम्ही लोक आता आराम
करा मी ग्राम पंचायतीत
जाउन संध्याकाळच्या सभेचे आयोजनाच बघतो!
संध्याकाळी
ठरल्या प्रमाणे ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले !
पारावार
सगळे सदस्य सरपंच हेड सर, पुष्कार
व गावातील जानते लोक बसले होती
व खाली समस्त गावकरी
मंडळी!
सरपंच
बोलण्यास उभे राहिले !
माधव
भाऊ: गावकरी मंडळी आजची तातडीची सभा
एका ख़ास कारणकरीता आयोजित
केले आहे, ते कारन
आहे आपली शाळा पुनः
सुरु करनेबाबत !
शाळेचे
कारन ऐकून सर्व गावकरी मंडली
आपसात कुजबुजायला लागले !
एक
गावकरी: पन सरपंच बांधकामावर
तर स्टे आहे कोर्टाचा
!
इतक्यात
पुष्कर जागे वरुण उभा
राहिला आनी बोलायला लागला
!
सरपंच
साहेब व् गावकरी मंडली
मधे बोलण्याकरीता माफ़ करा, पन
स्टे फ़क्त बांधकामावर आ,हे
शिकवण्यावर नाहीं, आन आम्ही ते करण्यास तयार
आहोत !
सरपंच:
हे आपले शाळेचे नविन
शिक्षक पुष्कर सर आहेत, व
ह्यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही ग्रामस्थ
तुमच्या मुलांना
पाठवण्यास तयार असाल तर
हे त्यांना शिकवतील !
दूसरा
गावकरी: पन साहेब आपल्याकड़े
दुसरी जागा कुठे आहे!
सरपंच:
त्यावर ही आम्ही मंडळीनी
विचार विनिमय करून तोडगा काढला
आहे! आपल्या कड़े गावच्या कोंड
वाड्याची गोठ्याची रीकामी ईमारत आहे! जी साफ़
करून तिथे वर्ग भरवण्यात
येतील!
तसा
ठराव आम्ही पास करत आहोत
व त्या करता तुम्ही
गावकरी लोकांच मत आम्हाला आज
हव आहे!
तुम्ही
लोकांच्या परवानगी व सोबती शिवाय आम्ही
हे करू शकत नाहीं
! आज शिक्षणाला किती महत्व आहे
हे तुम्ही गुरूजी च्या साहसा वरुण
दिसून येते ! आन मला वाटते
त्यांचे शिक्षण व आपली मुले
शिकावी ह्यकरता तळमळ हीच त्यांची खरी
ताकद आहे!
चांगले
शिक्षण हेच आपल्या मुलांचे
भविष्य सुधारु शकते ऐसे मला
मनापासून वाटते !
तर
ह्या कठिन पन महत्वाच्या
कामात तुम्हा लोकांची आम्हाला साथ लाभु शकेल
काय हां आज माझा
तुम्हे लोकांना सवाल आहे व्
याचे उत्तर सगळ्यानी द्यावाचे आहे हो किवा
नाहीं !
आता
तुम्हीच विचार करा !
सगळे
गावकरी आता विचारात पडले
की आता रामरावच्या विरोधात
कस जायच !
इतक्यात
ते सकाळी भेटलेले म्हातारे आजोबा उभे रहीले
म्हातारे
आजोबा: मास्टर मी माझे नातू
शाळेत पाठवण्यास तयार आहे ! जर
गुरूजी स्वतःचा विचार
न करता आमच्या मुलांना
शिकवण्यास तयार आहेत तर
ही तर आमची मुले
आहे त्यांच्या भविष्याचा , शिक्षणाचा विचार आम्ही करायला हवा !
आजोबांची
हिम्मत बघून अजुन काही
लोक उभे राहीले, आनी
बगता बगता काही वेळात
सगळे गावकरी उभे रहीले आनी
समस्त गावातील लोकांनी "हो आम्ही सोबत
आहोत " असा एक साथ
सुर लगावला !
आनी
मग काय दुसऱ्या दिवशी
गावकरी मंडली नी ती ईमारत
साफ केली, तिथे पुष्कर आनी
हेड सर यानी मुलांना
शिकवण्याची तयारी केली आन थोड्याच
वेळात गावातील लोक त्यांच्या मुलांना
या नविन शाळेत घेऊन
आले !
ह्या
नवीन शाळेचे काही दिवस चांगले गेले, पन ह्या
नविन शाळेच प्रकरण रामरावाना समजले त्यांची ताळपायची आग मस्तकात गेली
!
एक
दिवस पुष्कर शाळा संपवून परत
येत होता तेव्हा रस्त्या मधे एक जीप त्याच्या
समोर येऊन जोरात थाम्बली
!
त्यातून
अचानक १०-१५ पैलवान
मानस उतरली आनी त्यांनी त्याला
घेरल !
एक
पैलवान : ए मास्टर तू
कशायला मरायला रामरावा बरोबर पन्गा घेतला गावातील शाला पुनः सुरु
करून, आता गप गुमान
आमच्या बरोबर चल नहीं तर
मुसक्या बान्धुन घेऊन जाऊ !
पुष्कर
: ठीक आहे चला तर
मग ! जर या चांगल्या
कामाकारिता कोनी मला सजा
देत असेल तर ती
मी हसत हसत स्वीकारायला
तैयार आहे !
ते
लोक पुष्कर ला एक जीप
मधे बसउन एक मोठ्या
अश्या बंगल्या वर घेऊन आले
!
त्यातील
एक मोठ्या दीवान खाण्यात त्याला नेण्यात आले, तिथे नेता
बारोबर एक गुंडाने पुष्करला अचानक जोरात ढकलले त्यामुळे पुष्कर खाली जमीनीवर पड़ला.
खाली
पडल्यावर व एवढे लागल्यावर
सुद्धा पुष्कर उठूंन उभा राहीला तेव्हाच
!
एक
गुंड : सावकार बघा आम्ही त्या
मास्टर्ड्याला उचलून घेऊन आलो , हां
बघा तो !
पुष्कर
ने पाहिले की तिथल्या
एक सोफ्यावर एक मानुस बसलेला
होता, तो रागाने त्याचे
कड़े बघत होता !
पुष्कर
: रामराव् तुम्हीच का !
रामराव्:
हो मास्टर्ड्या मीच ! माझी तबियत काय
बिघडली काही दिवसात तुम्ही
लोकांनी तर शाळा परत
सुरु केली म्हणे ! आता
थाम्ब तिथेच मी तुझी कबरच
खोदतो !
पुष्कर
: मला जरी तुम्ही जीवे
मारले तरी आज न
उदया अजुन कोनी गुरुजी
येईल, तो ही शाळा
पुनः सुरू करेल आनी
तुम्ही काही ही करू
शकणार नाही!
पुष्कारच
उत्तर ऐकून रामराव् चा
पारा एक़दम चढला ! आनी
त्यानी तिथे ठेवलेली बन्दूक
उचलली आनी पुष्कर वर
नेम धरला
पुष्कर
ने आता त्याचे डोळे
बंद केले आनी उभा
राहिला ! त्याला वाटले चला आता मारायला
तयार व्हावे !
इतक्यात
एक आवाज आला
बाबा
थाम्बा त्यांना मारु नका ! तो
आवाज राधाचा होता जी रामरावची
मुलगी होती !
रामराव्:
नहीं पोरी तू मधे
पडु नको ह्याने माझा
अपमान केला , शिक्षा तर ह्याला मिळनार
!
राधा
: बाबा त्या दिवशी जर
ह्यानी माझे मदद केले
नस्ती तर तुम्ही आज
जिवंत नसता !
रामराव्:
हो बाबा मी खरा
बोलते आहे , त्या दिवशी मी
एक मिनीट जरी घरी यायला
लेट झाल असत, तर
तुमचा हार्ट अटैक ने त्याच
दिवशी मृत्यु झाला असता ! त्या
दिवशी माझी गाड़ी ह्यानीच
सुरु केली होती आनी
त्यामुळेच मी घरी वेळेवर
पोहचू शकले आनी तुमच्या
हार्ट अटैक वर तातडीन
इलाज करू शकले, खर
तर ह्यानीच तुमचा जीव वाचवला आनी आज तुम्ही
ह्यांनाच मारायला नीघालत हां कुठला न्याय
आहे बाबा !
आपल्या
मुलीच स्पष्ट बोलन ऐकून रामराव् थक्का
झाले ! त्यांची बंदूक त्यांच्या हातातून खाली पडली आन
ते सोफया वर मटकन बसले
!
राधा
ने त्यांना सावरल आनी म्हणाली !
राधा
: बाबा जर ह्यानी त्यांचे
कर्तव्य पार पाड़ले तर
तुम्ही का त्यांना आडकाठी
आनत आहात, त्यांना त्यांचे काम करू दया
! पुष्कर माफ़ करा माझ्या
बाबांच्या वतीने मी तुमची माफी
मागते !
पुष्कर:
राधा तुम्ही माफी नका मागु
! आनी जर मागायची असेल
तर ती समस्त गावतिल
लोकांची मागा ज्यांच्या मुलांची
शिक्षणाचे वाट आज तुमच्या
वडिलांकडून बंद झाली आहे
!
माझी
तुमच्या वडिलांना विनंती आहे के त्यांची
कीर्ति खूप मोठी आहे
त्यांनी काही कपटी लोकांचे ऐकून
गावा बद्दल जे वैर मनात कोरले आहे
ते सोडून द्यावे
! समस्त गांवच काय ते या
तालुक्याचे नेतृत्व करू शकतात! फ़क्त
त्यानी समाजसेवा करने सोडू नये
आनी ही सगळ्या गावकरी
लोकांची सुद्धा इच्छा आहे !
राधा
ने पुष्कर ला बसायला विनंती
केली, बाकी लोकांना बाहेर
जायला सांगीतले आता राधा ने
दोघांना पानी दिल
पुष्कर
आनी राम् राव घटा
घटा पानी प्याले ! बरच
वेळ ते दोघे एक
मेकाकडे बघत होते !
मग
राधा ने राम राव
ना म्हटले
राधा
: बाबा आता झाले गेले
विसरुन जा थोड़े शांत
झोपा मी तो पर्यंत
पुष्कर सरांना गावात सोडून येते
रामराव
यानी राधा व पुष्कर
कड़े बघितला व जा असा
इशारा केला !
पुष्कर
ने हात जोड़ून रामराव
ह्यांना नमस्कार केला आने तो
राधा बरोबर गाडीत बसून गावाकडे परतला
!
गावात
पुष्कर सर गायब झाल्याची बातमी पसरली होती व त्यामुळे
सगळे लोक पाराजवळ जमले होते त्यांच्या
मनात आक्रोश होता !
तेवाच
राधा ची गाड़ी पाराजवळ थांबली व पुष्कर त्या
गाड़ीतुन उतरला, त्याला बघून
लोकांची मने शांत
झाली !
राधा
: पुष्कर मी येते आता
! चिंता नसावी मी बाबाना समजावते
!
आनी
ती तिथुन निघून जाते !
काही
दिवसात गावतले वातावरण
नेहमी प्रमाणे नीवते !
नंतर
एक दिवस सरपंच एक सभा भरवतात,
ज्यामधे ते रामरावा कडून
शाळा बांधकामावरचा स्टे उठवल्याची बातमी
सगळ्यांना देतात सगळे गावकरी त्यामुळे
आनंदित होतात आनी दुसऱ्या दीवशी
पासून शाळा बांधकाम परत
जोमाने सुरु होते !
काही
महिन्यात ती बान्धुन पूर्ण
होते, शाळा उद्घाटनाला काही
दिवस बाकी असताना सरपंच
हेड सर व पुष्कर
ला बोलावतात
माधव
भाऊ: हेड सर आता
उदघाटनाचा दिवस जवळ आहे
आनी माझ्या मते ! तुम्ही दोघांच्या हस्ते हे उद्घाटन व्ह्याव
अस मला वाटते !
हेड
सर : फ़क्त पुष्कर च्या
प्रयत्न मुले आज हां
दिवस आम्हाला दिसला तर माझ्या मते
त्याने हे उद्घाटन कराव
अस मला वाटते ! काय
पुष्कर तू तयार आहेस
!
पुष्कर
: सर मला माफ़ करा
पन माझ्या मते रामराव् ह्या
करता योग्य आहेत, कारन ज्या जमीनी
वर आपली शाळा उभी
आहे ती जमीन त्यांच्या
पूर्वजानी गावच्या कल्याण करीता सरकारला वापराकरीता दीलीआहे !
माधव
भाऊ: ठीक आहे पन
ते उद्घटनाला येतील का !
पुष्कर
: हो आपण आनी गावातील
मोठी लोक जर स्वता जाऊंन त्यांना निमंत्रण देऊ तर ते
नक्कीच येतील !
माधव
भाऊ: ठीक आहे आजच
निमंत्रण पत्रिका घेऊन आपण जाऊ
!
ठरल्या
प्रमाणे सर्व मंडळी रामरावना
प्रमुख पाहुने म्हनून आमंत्रण दयायला जातात आनी रामराव् देखील
सगळ्याचे स्वागत करून त्यांचे आमंत्रण
स्वीकारतात !
ठरल्या
प्रमाणे उद्घाटनाची पहाट येते ! सगळे
गावकरी ठरल्या प्रमाणे उद्घाटन स्थली पोहचतात
पन
रामरावांचा पत्ता नसतो ! त्त्यांच्या फ़ोन लागत नाही
व घरी माणसे पाठवली
असता असे महित पड़ले
की ते व राधा
सकाळपासून कुठे तरी गेलेत
!
आता
उद्घाटनस्थळी उपस्थित सगळी मंडळी चिंतित होतात ! जर रामराव् नाहीं
आले तर उद्घाटन कस
करायचा ह्याचा विचार सगळ्यांना पड़तो !
माधव
भाऊ: पुष्कर तुम्ही करता का उद्घाटन
नाहीं तर खूप वेळ झाला वाट पाहून !
पुष्कर:
नाहीं सरपंच साहेब, मला अजूनही खात्री
आहे की रामराव उद्घाटनाला
येतील आपण अजुन थोड़ा
वेळ त्यांची वाट पाहू !
आनी
काही मिनट गेली असतांना
रामरावांची गाड़ी तिथे येऊन
पोहचते ! गाड़ी तुन रामराव्
उतरतात, त्यांना बघून सरपंच, हेड सर व
पुष्कर त्यांच्या स्वागताला हार व पुष्पगुच्छा
घेऊन पुढे होतात !
रामराव:
माफ़ करा मंडळी थोड़ा
उशीराच झाला, काही महत्वाच्या व्यक्तींना
उद्घटनाला घेऊन आलो आहे
चला तर मग लवकर
उरकून घेऊ सोहळा गावातील
मंडळी वाट पाहत असतील
!
सगळे
बुचकळ्यात पडतात की आता उद्घाटन
कोण्याच्या हस्ते होणार !
माधव
भाऊ: रामराव भाऊ कुठ आहेत
त्या महत्वाच्या व्यक्ति
रामराव:
राधा ! त्यांना गाड़ी तुन बाहेर
घेऊन ये .
सगळ्यांचे
लक्ष गाड़ी च्या दरवाज्या
कड़े जाते
पहीले
गाडीतून राधा बाहेर उतरते
!
राधा
: आई बाबा ! या आता बाहेर
आपण पोहोचलो!
आनी
लगेच एक म्हातारा
म्हातारी गाड़ीतुन बाहेर उतरतात, पुष्कर त्यांना बघून अचानक उद्गगारतो
आई
बाबा तुम्ही इथे कसे काय
!
सगळयाना
रामराव् ह्यांचा
मोठेपणा कळुन चूकतो, जे
त्या पुष्कर च्या आई बाबाच्या
हस्ते शाळेचे उद्घाटन करणार असतात ज्याच्या प्रयत्नाने ही शाळा खऱ्या
अर्थाने सुरु झाली !
पुष्कर
त्याच्या आई बाबांना बघून खूप खुश होतो
व त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात !
आता
समस्त मंडली शाळेच्या उद्घाटन फीत जवळ येतात
पुष्करच्या आई बाबा च्या
हातात राधा कैची देते
व त्यांच्या कडून फीत कपून
उद्घाटन सम्पन्न होते, टाळ्याचा कड़कड़ाट होतो !
सगळे
गांवकरी मोठ्याने म्हणतात गांव देव "ज्योतिबाच्या
नावाने चांगभल"
पुष्कर
माइक घेऊन भाषणाला उभा
राहतो !
पुष्कर:
गावकरी मंडळी ऐका आज जोतिबा देवाच्या कृपेने व इथे उपस्थित
समस्त लोकांच्या सहकारने गावातील सगळ्या मुलांकारिता बनलेली ही शाळा म्हणजे जणू
शिक्षणातील एक सोनेरी पहाट
आहे
आनी
म्हणूनच "शिक्षणाच्या
सुद्धा नावाने चांगभल "
तिथे
जमलेले सगळे एक सूरात
म्हणतात "ज्योतिबाच्या नावाने चांगभल" " शिक्षणाच्या नावान चांगभले “
Comments
Post a Comment