Posts

Showing posts from November, 2019

शिक्षणाच्या नावान चांगभल - Story

“ शिक्षणाच्या नावान चांगभल” लेखक : प्रशांत व्यवहारे आज पुष्करच्या मनामध्ये सकाळ पासूनच विचारांचा कल्लोळ चालला होता! शाळेत मुलांना शिकवतांना त्याचा लक्ष्यच आज काही केल्या लागत न्हवत! आज त्याची कन्फर्म रुजू ची आर्डर पोस्टाने येणार होती होती, व त्यामुळे तो सकाळ पासून पोस्टमन काकाची आतुरतेने वाट पाहत होता!    डी. एड झाल्या नंतर पुष्कर तीन वर्षा पासून ज़िल्हा परिषद् शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम पाहत होता,     सकाळ पासून त्याने दोन तीनदा हेडमास्टर सरांच्या केबिन मधे जाउन आर्डर बद्दल चौकशी केली! आनी आता तो चौथ्यांदा हेड सरांच्या केबिन च्या दरवाज्या बाहेर उभा होता. पुष्कर: हेड सर आत एउ का! हेड सर: या पुष्कर, अरे हो तुमची आर्डर अजुन आली नाहीं बरे का ! पुष्कर:   आता पर्यंत तर यायला हवी होती सर, शिक्षण सेवकाचा कालावधी संपल्या नंतर सम्पूर्ण दोन महीने झाले बिन पगारी आहे! हेड सर: पुष्कर समजू शकतो हो तुमची घालामेल, एके काळी माझी पन तुमच्या सारखीच अवस्था होती ! काळजी करू नका हो , ते आताचे अधिकारी चांगले आहेत आनी माझे कन्फर्म बोलन झाले आहे त्यांच...